प्रतिष्ठा न्यूज

जूनी पेंशन योजना लागू करण्यासाठी शिक्षक कर्मचारी यांचा शासनाविरूदध आझाद मैदान मुंबई येथे एल्गार!!!

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार

नांदेड दि.5 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षकांना त्यांची हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी दिनांक 3 मे पासून शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन उपोषण सुरू केले आहे . एक राष्ट्र एक मिशन, एकच मिशन जूनी पेंशन ही त्यांची मागणी आहे.
मार्च महिन्यात 18 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर इतर क्षेत्रातील कर्मचारी यांनी बेमुदत धरणे आंदोलन केले होते. शासनाने समिती नेमण्यात आली आहे.तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त असल्या कर्मचाऱ्यांना वारसांना वारसांना ग्रज्युटी आणि मोबदला देण्याचा निर्णय घेतला. परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी कुठलाही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त नंतर अनुदानावर आलेल्या कर्मचा-यांना 1982 च्या पेंशन योजनेतही नाहीत आणि एन.पी.एस. योजनेत ही नाहीत. तसेच मयत कर्मचारी यांच्या कुंटुबियांना निवृत्ती वेतनही नाही.व मृत्यु उपदानही नाही.
तरी शासनाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी दिनांक 3 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक,शिक्षकेत्तर यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून बेमुदत धरणे आंदोलन उपोषण जुनी पेन्शन समन्वयक संघ या संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे.
शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनीं यांना जुनी पेन्शन मिळावी ही मागणी त्यांची रास्त आहे मात्र शासन समिती नेमून वेळ निभावण्याचा प्रयत्न चालवत चालवत आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक राष्ट्र एक पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन या न्यायाप्रमाणे त्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्यासाठी हजारो हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर तर कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणासाठी बसले आहेत, या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षक इतर बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे समन्वयक सुनील भोर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.