प्रतिष्ठा न्यूज

खासदारांचे कामं चोख,गल्ली बोळातल्या नेत्यांनी श्रेय घेऊ नये पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत निमणी ते नेहरूनगर येळावी या ४.८७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या उन्नती करणाच्या कामाचा शुभारंभ आज खासदार संजयकाका पाटील यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री ना.डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक निमनीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी करून खडीकरणाच्या दोन थरा नंतर डांबरीकरण होणार असल्याची सविस्तर माहिती दिली.या रस्त्यावर दहा ठिकाणी मोऱ्या तसेच १०० मीटर बांधीव गटर व ७४ मिटर संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. टेंडर मधील मापकाप्रमाणे व दर्जेदार रस्ता व्हावा याकरिता रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले, तसेच रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी रोड क्रॉसिंग साठी आवश्यक ठिकाणी पाईपा टाकून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार निमणीच्या सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील,उपसरपंच राजेंद्र घोडके व सर्व सदस्यांच्या तसेच नेहरूनगर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वसंतदादा सहकारी कारखान्याचे संचालक विशाल पाटील यांनी खासदारांचे अभिनंदन करून लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी बोलताना खासदार संजयकाका म्हणाले पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पशुधनाच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जलजीवन मिशन  योजने मधुन सहाशे कोटी रुपयांची  योजना केली.मी एक कार्यकर्ता आहे नेता नाही श्रेय वादाची लढाई लढण्या पेक्षा तालुक्यात अनेक प्रश्न आहेत ते  सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करुया, जिल्ह्याच्या पुर्व भागात पाण्याची परिस्थिती बिकट आहे.चाऱ्याची टंचाई आहे प्रत्येक गावात जाऊन मी लोकांशी संवाद साधतोय.निसर्गाचे संकट मोठे आहे.निसर्गावर आपण पूर्णपणे मात करू शकत नाही,परंतु त्यातून थोडा फार मार्ग काढू शकतो.
स्वर्गीय आर आर पाटील यांच्या निधनानंतर आपल्या संस्कृती व परंपरेप्रमाणे काही काळ संघर्ष न करता समन्वयाची भूमिका ठेवली होती,अनेक जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर शंकाही घेतली होती परंतु अलीकडच्या काळात पुन्हा एकदा वेगळी भूमिका घ्यावी लागेल अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करण्याचे काम काही मंडळी करत आहेत.मंजूर रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टर यांना दिल्या.तासगाव कारखाना डिस्टिलरीसह येणाऱ्या गळीत हंगामात सुरू करणार असल्याचेही काकांनी सांगितले.राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे म्हणाले चंद्रयान मोहिमेमुळे जगभरातून भारत देशाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक व स्वागत करण्यात येत आहे ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांच्या साठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.खासदार संजय काकांनी अनेक रस्त्यांची कामे,राष्ट्रीय महामार्गाची कामे,शेतीसाठी व पिण्याच्या पाणी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या आहेत.केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचे काम आपल्या खासदारांनी चोखपणे केले आहे त्यामुळे गल्ली बोळातील नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.
अपेक्षित पाऊस झालेला नाही मात्र धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शेती व पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही याची खबरदारी घेऊ.कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरुड, तहसीलदार रवींद्र रांजणे,गटविकास अधिकारी अविनाश मोहिते,पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता अजय ठोंबरे,शाखा अभियंता सागर पाटील,प्रफुल्ल वसुदेव,कॉन्ट्रॅक्टर विशाल माळी,वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे,पोलिस पाटील सतीश अशोकराव पाटील,विलासराव पाटील, जगन्नाथ मस्के,विजय पाटील, अण्णासाहेब चौगुले,बबनकाका पाटील,पोपटराव पाटील,प्रहारचे सुधीर पाटील,रामदास जाधव,अंकुश भोसले,बाळासाहेब पाटील,राजगोंडा पाटील,मुख्याध्यापक पी डी गुरव, अमित देवकुळे निमणी, नेहरूनगर ,नागाव, जुळेवाडी, येळावी, तुरची, राजापूर येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,ग्रामसेवक,गावकामगार तलाठी,अंगणवाडी सेविका , मदतनीस,परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील यांनी आभार मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.