प्रतिष्ठा न्यूज

कुंडल रिंग रोड व देवराष्ट्रे अंबक रोड वरून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रहिवाशांच्या घरांचे नुकसान न करता उपलब्ध जागेत नवीन रस्ता करा, अन्यथा जनउद्रेक : ॲड. दिपक लाड व श्रीदास होनमाने यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : कुंडल येथील रिंग रोड वरून जाणाऱ्या पुसेसावळी -कडेगाव अंबक – देवराष्ट्रे कुंडल अंकलखोप राज्य महामार्ग क्रमांक SH 158 वर कुंडल येथील *एस टी स्टँड ते शिक्षक कॉलनी,कुंभारगाव रस्ता*
येथील रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाश्यांचे घरांचे  नुकसान न करता उपलब्ध जागेतच नवीन रस्ता करा अशी भूमिका रस्ता बाधित रहिवासी कृती समितीचे वतीने अँड दिपक लाड व श्रीदास होनमाने यांनी कुंडल येथील बाधित रहिवाशांच्या पूर्व प्राथमिक बैठकीत व्यक्त केली

यावेळी बोलताना अँड दिपक लाड म्हणाले येथील रहिवाश्यांचा रस्त्याला विरोध नाही

*या ठिकाणी स्वतःच्या जागेवर सिटी सर्व्हे नोंद असणाऱ्या* *स्वतःचे जागेत वर्षा पासुन*
*अनेक पिढ्या वास्तव्यास* *असलेली जुनी घरे वाडे तसेच आर्थिक मोठी गुंतवणूक करून नवीन इमारती या परिसरामध्ये उभारल्या आहेत*

सर्वसामान्य लोकांनी कष्टातून
ही घरे उभा केली आहेत या परिसरातून नव्याने होणाऱ्या मार्गासाठी जास्तीची जमीन संपादित न करता उपलब्ध जागेतून रस्ता करावा ,

तसेच ग्रामपंचायतची व शासन मिळकतीची जागा रस्त्यासाठी वापरावी व्यक्तिगत मालकीच्या जागेतील घरावर रस्ते उभारनेचा घाट घालू नये,तसे केले तर अनेक लोक बेघर होतील,याबाबतीत जन उद्रेक होईल.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना रहिवाश्यांच्या भावनांचे मागणीपर निवेदन देणार असल्याचे तसेच *रहिवाशांच्या मनाविरुद्ध*
*रस्त्याचे  कामकाज झाल्यास न्यायालयातून रस्ता बांधकाम कामकाज स्थगिती आदेश आणणार असल्याचे ऍड दिपक लाड यांनी कळविले.*

यावेळी दिलीप शिंदे,निलेश जौजाळ,प्रदीप शिंदे रामभाऊ माने, जीबी जाधव सर, निवास भाऊ सावत, रामभाऊ शिंदे, बजरंग सावत,अनिल पाटील रामभाऊ सावत, अमोल कांबळे
यांच्यासह महिला रहिवाशी उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.