प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुका काँग्रेसच्या सहकोषाध्यक्षपदी विनायक हंबर्डे

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील वाका येथील काँग्रेसचे युवा व सक्रिय कार्यकर्ते विनायक पाटील हंबर्डे यांची लोहा तालुका कॉंग्रेसच्या सहकोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री- डी.पी. सावंत यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष- गोविंदराव पाटील नागेलीकर, नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष प्रवक्ते- संतोष पांडागळे, लोहा तालुकाध्यक्ष- शरद पाटील पवार, भास्कर पाटील जोमेगावकर, उत्तम पाटील वडवळे, उध्दव पाटील ढेपे, रामराव पाटील, ज्ञानेश्वर डोंगरे, आदीसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते.या निवडीबद्दल विनायक हंबर्डे यांचे उमरा सर्कल मध्ये सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.