प्रतिष्ठा न्यूज

रोटरॅक्ट क्लब ऑफ तासगांवचा ग्रेप सिटी पदग्रहण समारंभ संपन्न..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : रोटरॅक्ट क्लब ऑफ तासगांव ग्रेप सिटी सन २०२३-२४ या वर्षातील पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ बुधवार दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ग्रीन रोटरी सेंटर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.रोटरॅक्ट क्लब ऑफ तासगांव ग्रेप सिटी च्या पदग्रहण समारंभ इनस्टॅलीग ॲाफिसर डी आर आर रोटरॅक्टर प्रांजल मराठे व प्रमुख पाहुणे पी डि जी रो.बाझील डीसुजा यांचे हस्ते संपन्न झाला.रोटरॅक्ट क्लब ऑफ तासगांव ग्रेप सिटी चे नुतन प्रेसिडेंट रोटरॅक्टर प्रथमेश घणेरे व सेक्रेटरी रोटरॅक्टर ऋत्विक विटेकर व इतर पदाधिकारी यांचा शपथग्रहण समारंभ संपन्न झाला.२०२२-२३ या वर्षीचे प्रेसिडेंट रोटरॅक्टर अक्षयकुमार सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावर्षी केलेल्या कार्याचा आढावा सेक्रेटरी रोटरॅक्टर ओंकार सावंत यांनी घेतला. यावेळी डी आर आर रोटरॅक्टर प्रांजल मराठे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व २०२३-२४ यावर्षी डी आर आर यांना अपेक्षित असलेल्या कामांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे पी डि जी रो.बाझील डीसुजा यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना यावर्षी मोठी समाजउपयोगी कामे हाती घ्यावीत असे आवाहन केले.त्यासाठी लागणारी मदत केव्हाही करण्यास तयार आहे असे सांगितले.या प्रसंगी पी डी आर आर राहुल मोहीते,रोटरी क्लब ॲाफ तासगांव,इनरव्हील क्लब ॲाफ तासगांव,इतर रोटरॅक्ट क्लब व डिस्ट्रिक्ट ३१७० चे पदाधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन रोटरॅक्टर ऋत्विक विटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटरॅक्टर सुहास कुलकर्णी यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.