प्रतिष्ठा न्यूज

गोदावरी काॅलेज नांदेड येथे बी. कॉम. बँकिंग शिक्षणाची संधी उपलब्ध; नोकरीची 100 टक्के हमी : राजश्री पाटील

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : सगळीकडेच आज डॉक्टर किंवा क्षेत्राकड भविष्यातील करीयरच्या दृष्टीकोनातून बघितले जाते. परंतु याशिवाय देखील अनेक क्षेत्रामध्य रोजगाराची संधी उपलब्ध आहे. यातीलच एक म्हणजे सध्या सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण झालेले आर्थिक क्षेत्र.

सर्वच क्षेत्राला आर्थिक शिस्त लावण्यासाठी यातील तज्ञ लोकांची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. विविध व्यावसातील प्रतिष्ठाने, लेखा परीक्षक, बँक, कॉर्पोरेट संस्था, विविध सहकारी संस्था, याठिकाणी लागणारे तज्ञ मनुष्य उपलब्ध होत नाही. म्हणून मराठवाड्यातील तरुणांना आर्थिक क्षेत्रातील रोजगाराभिमुख गोदावरी कॉलेजचा (बी.कॉम बँकिग) हा अभ्यासक्रम नांदेड शहरात सुरू झाला आहे, अशी माहिती गोदावरी समुहाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील यांनी दिली. सहकारसूर्य मुख्यालयात त्यांनी शनिवारी (दि.८) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सांगितले.

सर्व शाखांमधील ईजीनीअर या साचेबद्ध शिक्षण १२ वी पास विद्यापीठ संलग्नित तुकाई प्रतिष्ठान विद्यार्थी प्रवेशास पात्र कॉमर्स सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी

राजश्री पाटील पुढे म्हणाल्या की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संचलित गोदावरी कॉलेज ऑफ (बी. कॉम. बँकिग) हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. पदवी हातात येताच संबंधित विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यासाठी बँकिंग क्षेत्रासह इतर आर्थिक सेवा क्षेत्रातील जवळपास ८०० संस्थांसोबत गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगच्या माध्यमातून करार करुन विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा मानस संस्थापक तथा खा. हेमंत पाटील यांचा असल्याचे राजश्री पाटील यांनी सांगितले. यावेळी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर आणि गोदावरी बी. कॉम बँकिग कॉलेजचे संचालक अजय झरकर यांनीदेखील या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या राजर्षी हेमंत पाटील यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.