प्रतिष्ठा न्यूज

कापशी बु. 33 के.व्ही.उपकेंद्राचा गलथान कारभार: अनेक वेळा वीजेचा लपंडाव- रब्बी हंगामातील पिके धोक्यात

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील कापशी बु.येथील 33 के.व्ही.उपकेंद्र महावितरण कंपनीच्या नियोजन शून्य गलथान कारभारामुळे अंतर्गत गावातील वीज पुरवठा दिवसातून अनेक वेळा जात असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत.
येथील कनिष्ठ अभियंता यांच्या आदेशाचे पालन येथील कर्मचारी करत नसून कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फोनवर अथवा प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार करत असताना त्यांना उर्मट भाषेत कर्मचारी बोलत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून दिवसभरातून आठ ते दहा वेळा वीज पुरवठा खंडित होत असून या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत नागरिक व शेतकरी यांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वीज बंद चालू करण्याचे नियोजन बद्द वेळापत्रक यांच्या कडे नसल्याने शेतकऱ्यांना दिवसभर विजेची प्रतीक्षा करत बसावे लागत आहे.
याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना फोन केला असता फोन लागत नाही. लागला तर व्यवस्थित बोलत नाहीत. एकंदरीत विजे अभावी रब्बी हंगामातील पिके मात्र धोक्यात आली आहेत. यांचा गलथान कधी थांबेल असा सर्वांना प्रश्न पडला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.