प्रतिष्ठा न्यूज

हातनूरमध्ये विद्यार्थी गुणगौरव व गुणदर्शनातून प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी दि. 31 : हातनूर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळा हातनूर, उज्वल विद्यामंदिर हातनुर, पाटीलमळा हातनूर,सर्व अंगणवाडी, सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच प्रकाश एडके यांचे हस्ते ग्रामपंचायत जवळ मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, ढोल व ताशापथक, हायस्कूलचे झांजपथक, निवडक विद्यार्थ्यांची भाषणे, प्रजासत्ताक दिनाबद्दल विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतावरील नृत्ये अशी कार्यक्रमांची रेलचेल होती.
यावेळी जिल्हा परिषद शाळेची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये चार विद्यार्थी आल्याबद्दल स्नेहा शशिकांत पाटील ,संस्कृती संतोष सिंहासने, नेहा परशुराम पाटील, श्रेया अजीत पाटील, आठवी एन एम एस एस साईराज जालिंदर पाटील, सिद्धी संभाजी पाटील,आशुतोष संजय बुधावले या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता पाचवीचे मार्गदर्शक महाराष्ट्र युवारत्न शशिकांत राजाराम पाटील यांचा विशेष सत्कार पालक डॉक्टर अजित पाटील,परशुराम पाटील यांच्या व गावाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन आण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच आठवीचे मार्गदर्शक पल्लवी भोसले, ज्योती कापसे, वैशाली पवार,मुख्याध्यापक वसंतराव पाटील यांचाही ग्रामस्थांच्याकडून सत्कार करण्यात आला.
शालेय विविध शैक्षणिक स्पर्धांच्या मध्ये क्रमांक मिळवल्याबद्दल उज्वल विद्यामंदिरचे विद्यार्थी त्याचबरोबर मुख्याध्यापक यांचा राज्यस्तरीय मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हातनुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उल्लेखनीय कामाबद्दल डॉक्टर विक्रम पाटील, त्यांचे सहकारी व सहाय्यक तांबोळी सिस्टर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सुट्टीवर असलेले सैनिक सागर शिंगाडे, पोलीस कर्मचारी एकनाथ भाट आदींचा यावेळी प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मध्ये आध्या नंद्यापगोळ या अंगणवाडीच्या विद्यार्थीनीच्या भाषण व नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हा परिषद शाळेसाठी तीन लाख रुपये निधी मित्सुबिशी कंपनीच्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षिका सुनीता कुंभार व त्यांचे चिरंजीव राहुल कुंभार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हातनुर ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेली कामे, गावातील विकास कामे व भविष्यातील विकास कामे तसेच होनाई मंदिराच्या बाबतीत चालू असलेली व भविष्यातील विकासकामे व एकंदरीत गावाचा शैक्षणिक व विकासात्मक आढावा कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन आण्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या पुढे मांडला.
शहीद जवान दिलीप पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने विद्यार्थ्यांना शील्ड वाटप करण्यात आले. मारुती कन्स्ट्रक्शनचे मच्छिंद्र पाटील यांचे कडून सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पालक, आजी-माजी सैनिक, नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.