प्रतिष्ठा न्यूज

सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील मानधन ततत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळणेबाबत आम आदमी पार्टीकडून आयुक्तांना निवेदन…

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नवीन कर्मचारी भरती करणेचा ठराव संमत झाला आहे. या अनुषंगाने लवकरच महापालिकेची नवीन कर्मचारी भरती सुरु होणार आहे. सध्या महापालिकेत जवळपास अनेक कर्मचारी हे गेल्या बऱ्याच वर्षापासून मानधन तत्वावर कार्यरत आहेत. अद्याप महानगरपालिकेने त्यांना कायम केलेले नाही. आता त्यांना डावलून सरळ सेवाभरतीची प्रक्रिया करण्यात येत आहे. हा प्रकार अन्यायकारक व सर्वस्वी चुकीचा आहे.
बदली, रोजंदारी व मानधनतत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम कायम करून त्या नंतरच सरळ सेवा भरतीची प्रक्रिया राबविण्यात यावी. अन्यथा आम आदमी पार्टीकडून सर्व मानधन तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व या आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीकडून आयुक्त सुनिल पवार यांना देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र सचिव वासीम मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.