प्रतिष्ठा न्यूज

सदाभाऊ खोत यांनी बँड कलाकारांची माफी मागावी अन्यथा बँड बजाओ आंदोलन चा बँड मालक व कलाकार कृती समिती चे अध्यक्ष शुभम जाधव यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली मध्ये काल झालेल्या महायुती मेळाव्या मध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाषण करताना बँड कलाकारांबद्दल ” आम्ही बँडवाले नाही आम्हाला सन्मान द्या ” असे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केले याबद्दल बँड मालक व कलाकार कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम जाधव यांनी आज निषेध व्यक्त केला.

यावेळी ते म्हणाले की ,मा.राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे हे वक्तव्य निंदनीय असून यामुळे आमच्या बँड कलाकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत

बँड व्यवसायाला खूप मोठा इतिहास आहे याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा , बँड ची परंपरा आज अनेक कलाकार जपत आहेत , कोणत्याही शुभकार्यासाठी बँड कलाकारांना सन्मानाने बोलावले जाते, व हे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात महायुती मध्ये जर त्यांना काही मिळत नसेल व त्यांना बेरजेत धरले जात नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्याचे आत्मचिंतन करावे व सर्व बँड कलाकारांची तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या निवासस्थाना समोर बँड बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ही यावेळी अध्यक्ष शुभम जाधव यांनी दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.