प्रतिष्ठा न्यूज

कोविड कालावधीमध्ये सेवा बजावत असणाऱ्या मयत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या 50 लक्ष सानुग्रह अनुदानाचे वाटप

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून कोविड कालावधीमध्ये सेवा बजावत असणाऱ्या मयत झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या 50 लक्ष सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले . राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आज मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या 50 लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. महापालिका सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास खासदार संजय काका पाटील , आमदार सुधीर गाडगीळ , महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार , माजी आमदार दिनकर पाटील , स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी , उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे , जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार , भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे , भाजप नेत्या केळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. कोविड काळात एकूण 12 कर्मचारी मयत झाले होते. यापैकी 8 कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आलेल्या प्रत्येकी 50 लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले . उर्वरित चार कर्मचाऱ्यांचे वारस निश्चिती नंतर त्यांनाही हे अनुदान वितरित केले जाणार आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आली होती. आज शासनाकडून आलेल्या 50 लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप केल्यानंतर मृत महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं.
यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी कोविड कालावधीमध्ये महापालिका प्रशासनाने चांगले काम केल्याचे गौवोद्गार काढीत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच अन्य देशांमध्ये सध्या कोविडच्या लाटेची परिस्थिती आहे मात्र भविष्यात महाराष्ट्रात कोविड सारखी परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला तोंड देण्यासाठी शासन त्याला तोंड सज्ज असल्याचे सांगितले. त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यात सुद्धा कोविड कालावधीमध्ये ज्या व्यवस्था सुरू होत्या त्या पुन्हा कार्यरत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले. याचबरोबर 55 कोटींचा निधी हा कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला भरघोस निधी दिल्याबद्दल सभापती धीरज सुर्यवंशी यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार केला. तसेच कोविड काळात तसेच अनेक आपत्ती काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमचे पालकमंत्री खाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी केले तर आभार उपायुक्त स्मृती पाटील यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.