प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. आनंदराव मोहीते यांना सांगली काँग्रेसची मानवंदना

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि.२०:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, तासगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्व.आनंदराव मोहिते (भाऊ) यांचे वयाच्या ९४ व्या दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. काँग्रेस सेवा दलाने पार्थिवाला सलामी दिली. काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्व. डॉ. पतंगराव कदम आणि आमदार मोहनशेठ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. आनंदराव मोहीते यांनी परिश्रम घेतले होते. १९९० ते २००० या काळात जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी केली होती. आज त्यांचे पार्थिव काँग्रेसभवन समोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी सौ. विजया पृथ्वीराज पाटील,विश्वासबापू पाटील, किशोर शहा, मुन्ना कुरणे,करीमभाई मेस्त्री, बिपीन कदम, सनी धोतरे, श्रीकांत जाधव वकील, संजय मेंढे, सी. आर. सांगलीकर,डॉ. सिकंदर जमादार,प्रकाश मुळके, सचिन चव्हाण, अजित ढोले,मौलाली वंटमुरे, अजय देशमुख, भारती व दीक्षितकुमार भगत,पैगंबर शेख, अरुण पळसुले,विठ्ठलराव काळे, अशोकसिंग रजपूत, प्रकाश जगताप,संग्राम पाटील, धनाजी जाधव, बाबगोंडा पाटील, भाऊसाहेब पवार वकील, सुवर्णा पाटील, सीमा कुलकर्णी, मिना शिंदे, जहीर मुजावर व सांगली शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेस कमिटी पदाधिकारी, सदस्य, सर्व फ्रंटल व विभागाच्या कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.