प्रतिष्ठा न्यूज

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस विभागाची बैठक संपन्न : महापालिकेकडून स्वच्छतेचे तर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 28 जून रोजी होत असलेल्या बकरी ईदसाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेसह आवश्यक बाबींची तयारी पूर्ण केली आहे. तसेच येणारा बकरी ईदचा सन शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले.
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत महापालिका आणि पोलीस विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मनपा उपआयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपअधीक्षक सांगली शहर अण्णासाहेब जाधव आणि मिरज विभागाचे उपअधीक्षक प्रनिल गिल्डा आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त पवार यांनी पोलीस विभागासमवेत महापालिका स्वच्छता निरीक्षक तसेच पशू वैद्यकीय विभागाची संयुक्त बैठक घेऊन बकरी ईदचे स्वच्छ्ता, कायदा आणि सुव्यवस्था याबाबत नियोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आयुक्त सुनील पवार म्हणाले की, बकरी ईदच्या आगोदर आणि त्यानंतरही मनपा क्षेत्रातील सर्व मशिदी आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता केली जाणार आहे. ज्या ठिकाणी कुर्बानी आहे अशा ठिकाणी तात्पुरते कंटेनर ठेवले जाणार आहेत. याचबरोबर कुर्बाणी नंतर पडणारा कचरा अन्यत्र पडू नये किंवा उघड्यावर पडू नये यासाठी त्या भागातील नागरिकांना बायोमेडिकल बॅग दिल्या जाणार आहेत. जेणेकरून कुरबानी नंतरचा कचरा त्या बॅगमधून थेट हा कचरा कंटेनरमध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. गोळा केलेला कचरा हा थेट कचरा डेपोत नेऊन तिथे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी मनपाक्षेत्रात ठिकठिकाणी तात्पुरते कंटेनर ठेवले जाणार आहेत. कूर्बानी नंतरचा कचरा लगेच उचलला जाणार असून दोन सत्रात हे काम कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा रस्त्यावर उघड्यावर न टाकता महापालिकेकडून दिलेल्या बायोमेडिकल बॅगेत भरुन कंटेनर मध्ये टाकावा असे आवाहनही आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे. यावेळी पोलीस विभागाने केलेल्या नियोजनाबाबत सांगलीचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यानी सांगलीतील तर प्रनिल गिल्डा यानी मिरजेतील पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था तयारीची माहिती दिली. तसेच येणारा बकरी ईदचा उत्सव शांततेत तसेच उत्साह पूर्वक वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखत साजरा करावा असे आवाहन केले.
या बैठकीस सांगली शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, मिरज शहर पोलिस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव,
संजयनगरचे पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मिरज ग्रामीणचे सहा. पोलिस निरीक्षक एस एस चव्हाण, मिरज वाहतूक शाखेचे भगवान पालवे यांच्यासह मनपाचे सहायक आयुक्त अशोक कुंभार, उज्वला शिंदे, सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.