प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालयात योग दिन उत्साहाने साजरा

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांंदेेड : आज 14 वा जागतिक योग दिन नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंत नगर, नांदेड येथे विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने संपन्न झाला. जागतिक योग दिन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक टी. एन. रामनबैनवाड व अमोल भंगाळे तसेच एनसीसी विभागप्रमुख डॉक्टर गाडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक बी एम हंगरगे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक तथा नांदेड जिल्हा योगा असोसिएशनचे सचिव टी. एन. रामनबैनवाड यांनी प्रात्यक्षिकासह सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने झाली. योगा प्रार्थना संस्कृत शिक्षिका के. पी. जायभाये मॅडम यांनी सादर केले.कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली .शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकाने सर्व विद्यार्थी, योग साधक यांना योगा बद्दल माहिती दिली. सदरील कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डॉक्टर पी. एम. यमलवाड सर तसेच पर्यवेक्षक पी. एम. सावंत यांची उपस्थिती होती कार्यक्रम प्रसंगी शाळेचे योग पटू यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी योग महोत्सवात शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.