प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिकेची सोमवार आणि मंगळवारी शहरात विशेष मोहीम…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सध्या पावसाळी दिवस असल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याने तासगाव नगरपरिषदे मार्फत एक विशेष मोहिमेद्वारे या बाबत विविध उपाययोजना (धूर फवारणी, औषध फवारणी ई.) नालेसफाई सुरु आहे.त्याच अनुषंगाने सोमवार दि. 29/07/2024 रोजी आपल्या परिसरात असणारे खराब टायर, नारळाच्या करवंट्या व इतर अनुषंगिक साहित्य गोळा करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतलेली असून याबाबत नागरिकांनी पुढाकार घेऊन तासगाव नगरपरिषदेस सहकार्य करावे.तसेच मंगळवार दि.30/07/2024 रोजी तासगाव नगरपरिषदे मार्फत कोरडा दिवस पाळण्यात येणार असून त्या दिवशी संपूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे.या दिवशी तासगाव शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरात असलेली पाण्याची भांडी रिकामी करुन स्वच्छ व कोरडी ठेवावीत व तासगाव नगरपरिषद मार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन पालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.