प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यात जोरदार पावसामुळे चोवीस तासात आठ लाखांचे नुकसान

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. २६ : अति पावसामुळे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात गेले चार दिवसात जोरदार पाऊस व वादळीवाऱ्याने धुमाकूळ घातला असून अकरा घरे व पाच गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झाले. केवळ चोवीस तासात आठ लाखांची हानी झाली. काल कुंभी धरण क्षेत्रात ११२ मि. मी. तर कोदे धरण क्षेत्रात २८४ मि. मी. विक्रमी पाऊस झाला.
तालुक्यात असंडोली, वेतवडे, मंदूर, धुंदवडे, खडूळे, बावेली,गारिवडे, व गगनबावडा या गावात नुकसान झाले असून राहत्या घरासह जनावरांच्या गोठ्यांच्या भिंती पडून, घरावर झाडे पडून, घरावरील पत्रे उडून ऐन पावसाळ्यात नुकसान झाले आहे. तहसीलदारानी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.