प्रतिष्ठा न्यूज

रब्बी ज्वारीसाठी पीक विमा योजनेत भाग घेण्यास 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 4 : प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 अंतर्गत रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 होता. मात्र, पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित असण्याची शक्यता आहे. यास्तव या शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा, या दृष्टिकोनातून रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने 5 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेल्या रब्बी ज्वारी पिकाच्या इच्छुक शेतकऱ्यांनी 5 डिसेंबर 2023 पर्यंत विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 15 डिसेंबर 2023 आहे. याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे कृषि कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.