प्रतिष्ठा न्यूज

समाजाच्या विविध मागण्यासाठी सोमवारी तासगावात धनगर बांधवांचा भव्य मोर्चा..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (ST)आरक्षणाची अंमलबजावणी करणेबाबत व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचें तासगाव शहरांमध्ये भव्य असे स्मारक उभा करण्यासाठी,मेंढपाळ व मेंढ्यांच्यावर होणारे हल्ले थांबून हल्ले करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी सदृश्य गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी व मेंढपाळ बांधवांना संरक्षण द्यावे,या व इतर मागण्यासाठी तासगाव तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव यांच्या वतीने सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता तासगाव भिलवडी नाक्यातून सिद्धेश्वर चौक मार्गे बस स्थानक चौकामध्ये येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्याचे सभेत रूपांतर होऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घेण्याचे कारण त्यांनी ज्यावेळी घटना लिहिली त्या घटनेमध्ये अनुसूचित जमाती एसटी चे आरक्षण धनगर जमातीला दिलेले असताना धनगर जमात वेगवेगळ्या मार्गाने गेले 75 वर्ष सोयी – सुविधाला मुखलेला आहे,म्हणून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील व देशातील सर्व राजकीय पक्षांनी वेळोवेळी पोकळ आश्वासने देऊन धनगर जमातीला आजपर्यंत झुलवत ठेवून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल आहे.त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतील आरक्षण अंमलबजावणी शासनाने केली नाही,म्हणून तासगाव तालुक्यातील धनगर जमातीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती आज धनगर कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.शासनाने वेळोवेळी जाणूनबुजून आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केल आहे,समाज याआधी एकत्र येत न्हवता,आता समाज एक होत आहे,हें आरक्षण मिळाले तर आपल्या पोराबाळांच कल्याण होणार आहे त्यामुळे समाज बांधव पेटून उठला आहे,राज्यात आमचा समाज दोन कोटी असून आम्हाला आरक्षण पासुन वंचित ठेवण्यात आलं आहे,सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा आणि इतर समाज बांधवानी आम्हाला पाठिम्बा द्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांनी केले.तालुक्यातील हजारो समाज बांधव शेळ्या मेंढ्या घेऊन,आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोर्चा ला येणार असून सरकारला धनगर समाजाची दखल घ्यावीच लागेल,असा ऐतिहासिक मोर्चा होणार असल्याचे यावेळी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील,प्रमोद आप्पा शेंडगे जिल्हा परिषद सदस्य,रामभाऊ थोरात मा.सरपंच कवठे एकंद, बाळासाहेब ऐडके मा सरपंच वांसुबे,माजी उपसभापती प्रभाकर काका पाटील, मुकुंद ठोंबरे संचालक मार्केट कमिटी, ऍड. विनायक पाटील,अर्जुन थोरात, श्रीनिवास पाटील,विकास मस्के,उमेश गावडे,संभाजी गावडे,दशरथ गावडे, अर्जुन हजारे छबुतात्या शेळके,उत्तम जानकर, मारुती एडके विवेक शेंडगे भरत थोरात पांडुरंग शेळके विलास पाटील विठ्ठल गावडे मनोहर शेंडगे राहुल हजारे अमोल हुलवाने अधिकराव हजारे विक्रम बंडगर आदी समाज बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.