प्रतिष्ठा न्यूज

कृष्णेची पाणी पातळी २५ फुटांवर : पूर येणार काय? वारणा धरणातून 9448 क्यूसेस विसर्ग

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पावसाची संततधार सुरू असल्याने विविध धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सांगलीत आयुर्विन पुलाजवळ २५ फुट इतकी पातळी आहे. अचानक पाणी वाढल्याने पूर येणार काय ? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी ४० फुट असून अजून तरी धोकादायक स्थिती नाही.
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 79.12 (105.25), धोम 10.30 (13.50), कन्हेर 8.38 (10.10), वारणा 31.05 (34.40), दूधगंगा 21.18 (25.40), राधानगरी 8.34 (8.36), तुळशी 3.11 (3.47), कासारी 2.31 (2.77), पाटगांव 3.30 (3.72), धोम बलकवडी 3.71 (4.08), उरमोडी 8.30 (9.97), तारळी 5.33 (5.85), अलमट्टी 115.55 (123).

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्यूसेस पुढीलप्रमाणे. कोयना – निरंक, धोम – निरंक, कण्हेर – 4849, वारणा – 9448, दुधगंगा – 3136, राधानगरी- 3028, तुळशी – निरंक, कासारी – 1090, पाटगांव – 250, धोम बलकवडी – 3788, उरमोडी – 263, तारळी – 2155 व अलमट्टी धरणातून – 125000 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.

पूर नियंत्रण कक्ष*,
*सांगली पाटबंधारे विभाग सांगली.*
दिनांक – 10/08/2022 @ 8:00 PM

*पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)*
(धोका पातळी/आत्तची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/16’1″
2)भिलवडी पूल – (53)/26’11”
3)आयर्विन- (45)/25’9″
4)राजापूर बंधारा -(58)/39’11”
5) राजाराम बंधारा-(43)/41’02”

*पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)*
1) कृष्णा पूल कराड- 28156
2) आयर्विन पूल – 45530
3) राजापूर बंधारा- 114500
4) राजाराम बंधारा – 60870
5) कोयना धरण –   80.45 TMC / 0
6) वारणा धरण- 31.05 TMC /  9448
7)अलमट्टी धरण- 115.546 TMC
आवक  – 136944
जावक-1,75,000

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5 (290.4), जत 1 (266.2), खानापूर-विटा 3.8 (343.4), वाळवा-इस्लामपूर 8.9 (428), तासगाव 4.6 (284.9), शिराळा 32 (834.3), आटपाडी 0.3 (214.8), कवठेमहांकाळ – 6.3 (378.5), पलूस – 2.7 (259.5), कडेगाव 5.3 (338.1)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.