प्रतिष्ठा न्यूज

चितळे महाविद्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सवास प्रारंभ

प्रतिष्ठा न्युज/पंकज गाडे
भिलवडी : भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमास प्रारंभ झाला असून महाविद्यायाने ७५ कार्यक्रमाचे संयोजन केले असून त्यामध्ये मानवी साखळी , ग्राम फेरी ‘ रांगोळी , प्रश्नमंजूषा , पोस्टर प्रदर्शन , चित्रपट ‘ वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून आज दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक विभाग प्रमुख , प्रा. एस.एस. पाटील व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. व्ही ..एस विनोदकर यांच्या संयोजनाने महाविद्यालयामध्ये मानवी साखळी व त्यांनंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी कर्मचारी यांनी भिलवडी गावामध्ये प्रबोधन फेरी काढली होती या वेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ विद्याताई पाटील , सदस्य सौ . सीमा शेटे ‘ भिलवडी विभागाच्या सर्कल सौ सुरेखा जाधव , भिलवडी मध्ये राष्ट्र गीताची परंपरा सुरु करणारे समाज सेवक दीपक पाटील यांनी मनोगते व्यक्त केली तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यानी भिलवडी व परिसरास असणारा देशभक्ती व सैनिकांचा वारसा कथन केला . यावेळी या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ , तरुण उपस्थित होते .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.