प्रतिष्ठा न्यूज

मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबाच्या हस्ते उद्घाटन संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन दि.31डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाले, त्याप्रसंगी मुदखेड शहरातील विविध झालेले विकास कामे आणि विरोधी सरकारकडून येणाऱ्या कामामध्ये अडचणी, पक्ष संघटनेत काम करणाऱ्या लोकांना संधी दिली जाईल असे सांगितले. पुढील होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी करणेसाठी काँग्रेस पक्षाची बूथ निहाय प्रचार यंत्रणा व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना दिल्या. त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष- मा.अमरनाथ राजुरकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- गोविंदराव शिंदे नागेलीकर, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष/ बाळासाहेब देशमुख बारडकर, मुदखेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- माधवराव कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुदखेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-: माधवराव कदम यांनी केले. यावेळी त्यांनी शहरात झालेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. तसेच यावेळी भोकर विधानसभा युवक अध्यक्ष- मारोती पाटील शकतिर्थकर, बंदेअली पठाण, वडे सर, लक्ष्मणराव देवदे, गंगाधर डांगे, गोविंद कालानी, शिवानंद देवके, बजरंग खोडके, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामराव खांडरे डोणगावकर यांनी केले व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक संजय आऊलवार यांनी केले.
कार्यक्रमासाठी मुदखेड शहरातील माजी अध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष व मुदखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.