प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात योग दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : योगासने व प्राणायम यांच्या दररोजच्या सरावामुळे व्यक्तीला अनेक फायदे होत असतात,शरीरातील आजार हळूहळू कमी होऊन नंतर पूर्णपणे बरे होतात.दैनंदिन कामे करणे सुलभ होते.कोणतेही कार्य करण्यास उत्साह असतो.तसेच योग अभ्यासामुळे शारीरिक व मानसिक सुदृढता प्राप्त होऊन आत्मविश्वास वाढतो” असे मार्गदर्शन प्रा.डॉ.एम एस उभाळे यांनी उपस्थित विद्यार्थीनींना केले.तासगाव येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.पाटील यांनी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या योग माहितीवर आधारित भितीपत्रिकेचे प्रकाशन केले.त्यानंतर प्रा.डॉ.एम.एस.उभाळे यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थिनींसाठी योग प्रात्यक्षिके घेतली.त्यात सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार,शयन स्थितीतील आसने,विपरीत शयनस्थितीतील आसने,बैठे स्थितीतील आसनेदंड (उभ्या) स्थितीतील आसने व त्रिमुद्रा प्रत्यक्ष करून घेतल्या.त्यावेळी त्यांनी ‘योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शनही केले.कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.डॉ.ए.टी. पाटील,प्रा.डॉ.लक्ष्मी भंडारे,प्रा.डॉ. अर्चना चिखलीकर, प्रा.ए.आर.पंडित यांनी प्रयत्न केले.तर श्री एस.आर. कुंभार,सुजाता हजारे,अस्मिता साळी, श्री एच.टी.वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.