प्रतिष्ठा न्यूज

सावळसिध्द विकास सोसायटीचा 14 % लाभांश जाहीर वार्षीक सर्व साधारण सभा खेळीमेळीत

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज : सावळज ता.तासगाव येथील श्री सावळसिध्द विकास सोसायटीची सन 2022-23 या अहवाल सालची 99 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या हाँल मध्ये बुधवारी खेळीमेळीत पार पडली.यावेळी सभासदांना 14 % लाभांष जाहीर करण्यात आला.संस्थेचा शताब्दी महोत्सव वर्षभर साजरा करुन सभासदांना भेटवस्तुसह विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

सावळसिध्द विकास सोसायटीस सन 2022 -23 या अहवाल सालात जिल्हातील विक्रमी नफा एक कोटी चाळीस लाख झाला आहे.संस्थेच्या संचालक मंडळाने अतिशय काटकसरीने कारभार करुन विक्रमी नफ्याने तालुक्यात संस्थेचा नावलौकीक वाढवला आहे.संस्थेला आँडीट वर्ग ‘अ’ दर्जा मिळाला आहे.पुढील वर्ष संस्थेचा शताब्दी वर्ष म्हणुन साजरा करण्यात येणार आहे.शताब्दी महोत्सव मध्ये सभासदांना भेटवस्तु व विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.संस्थेची सर्व्हे नं 518 मधील रयत शिक्षण संस्थेची जमिन भाडेकरार रद्द करुन माघारी घेणे,केंद्र शासनाचे धोरणाने शेती उपयोगी नवनविन विभाग काढण्याचे ठरावाला सभासदांनी मान्यता दिली.

यावेळी सभासदांकडुन संस्थेस विक्रमी नफा झालेबद्दल संचालक मंडळाचा सत्कार करणेत आला.वार्षीक सभेचे प्रास्तावीक व स्वागत संचालक संदिप माळी तर अहवाल वाचन सचिव निलेश रिसवडकर यांनी केले. आभार संचालक प्रदिप माळी यांनी मानले.तर सभासदांच्या प्रश्नांना संचालक प्रशांत कुलकर्णी यांनी उत्तरे दिली.यावेळी पॅनेल प्रमुख ऋषिकेश बिरणे, व्हा.चेअरमन बाळासो थोरात, सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.