प्रतिष्ठा न्यूज

सावळजमधील पळसाडी तलाव म्हैशाळच्या पाण्याने भरा : प्रभाकरबाबा पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज : सावळज ता.तासगाव येथील पळसाडी तलाव,पवार खोरा ,बसवेश्वरनगर येथे म्हैशाळ सिंचन योजनेचे पाणी सोडून या पाण्यापासुन वंचित परिसराला हक्काचे पाणी मिळावे,अशी मागणी भाजपचे युवा नेते मा.प्रभाकर बाबा पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.पळसाडी तलावाची पाहणी करुन त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

पवार खोरा परिसरात वज्रचौंडे जवळ गव्हाण उपसा सिंचन योजने पाणी आले आहे.काही थोड्या भागाला यातुन पाणी मिळते.परंतु बराचसा परिसर हक्काच्या पाण्यापासुन वंचीत आहे.तरी वज्रचौंडे पासुन विस्तारीत पाईपलाईन टाकुन हा पळसाडी तलाव भरल्यास संपुर्ण पोळ वस्ती,थोरात वस्ती,जाधव वस्ती,पाटील वस्ती,निकम व पवार वस्ती ते कोरे- पाटील वाडी वस्तीला ओघळीत वाहुन पाणी मिळु शकते. अशी मागणी शेतकऱ्यांनी मा.प्रभाकर बाबा पाटील यांचेकडे केली.यावेळी पाटील यांनी म्हैशाळचे अधिकारी यांचेशी फोनवरुन संपर्क साधला.या पळसाडी तलावात कोणत्या प्रकारे नियोजन केल्यास पाणी देता येईल,याचे सर्व्हे करणेस सांगीतले.सर्व्हे झाल्यानंतर पाटबंधारे अधिक्षक अभियंता पाटोळेसो यांचेशी यानंतर बैठकीत योजनेचा पाठपुरावा करण्याचे ठरले.

यावेळी पै.ऋषिकेश बिरणे,योगेश पाटील,बी.एस पाटील,मेजर आप्पासो निकम,सुरेश निकम,दत्तात्रय पाटील,गजानन पाटील,रावसाहेब गरड,विनायक पवार,कल्लाप्पा थोरात,शंकर पवार,प्रशांत निकम,पोपट पवार,हणमंत पोळ,बाळासो थोरात,सुनिल निकम तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.