प्रतिष्ठा न्यूज

माजी आमदार किशनराव राठोड यांचे वृद्धापकाळाने निधन:पार्थिव देहावर उद्या सकाळी मौजे कमळेवाडी ता मुखेड येथे अंत्यसंस्कार होणार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.22 : नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी विधान परिषद सदस्य तथा मराठवाड्यात शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचवणारे विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगरचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड यांचे दुःखद निधन सोमवार दि 21/8/2023 रात्री 1.00 वाजता हैद्राबाद येथील खाजगी रूग्णालयात झाले.ते मागील एक महिन्यापासून येथे उपचार घेत होते. त्यांचा पार्थिव देह हैदराबाद येथून कमळेवाडी ता.मुखेड येथे मंगळवारी आणण्यात येणार असून अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा,नातू पणतू असा मोठा परिवार असून ते आ. तुषार राठोड यांचे काका होते.
त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कंधार फाटा, कमळेवाडी ता. मुखेड जि. नांदेड येथे होणार आहे.
त्यांच्या निधनाने राठोड परिवार व व विमुक्त जाती सेवा समिती वसंनगरच्या सर्व परिवारावर तसेच नांदेड जिल्ह्यावर शोककाळा पसरली आहे. त्यांना प्रतिष्ठा न्युज,नेटवर्क टीम नांदेड कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.