प्रतिष्ठा न्यूज

खाडे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी एकविसाव्या शतकातील स्पर्धेसाठी आहेत सज्ज : आरती चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : भारतात विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ व ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारीला चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
        दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आरती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चव्हाण यांनी मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे फायदे उदाहरणे, दाखले देवून समजावून सांगितले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातही विज्ञान किती फायदेशीर ठरले आहे, हे सांगितले.
           या प्रदर्शनात मुलांनी जैविक अन्न साखळी, चांद्रयान, जलचक्र, मानवी शरीराविषयी माहिती दर्शवरणारे तक्ते, मानवी कामांमध्ये उपयोगी पडणारे रोबो, खगोलशास्त्रावरील विविध उपक्रम, ज्वालामुखी, सौर ऊर्जेवरील शहर असे अनेक उपक्रम शिक्षकांच्या मदतीने करून विद्यार्थ्यांनी सर्वांची वाहवा मिळवली. या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमनताई खाडे प्रशांत खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.