प्रतिष्ठा न्यूज

दूध दरासाठी प्रदीपकाका पाटील यांचे तासगाव तहसीलदार यांना निवेदन ; दुध उत्पादक संघर्ष समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : दूध दरासाठी शिवसेना उबाठाचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीपकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तासगाव तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे,
सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. परंतू आजरोजी उत्पादन खर्च पाहता त्या तुलनेत दुधाचे दर खुपच कमी आहेत. त्यामध्ये त्याचा उत्पादन खर्चही भागत नाही. आज खासगी दुधसंघानी दुधाचे दर गतवर्षीपेक्षा कमी करून दुध उत्पादकाचे कंबरडे मोडून, जगणे मुश्किल करून सोडले आहे. या जगण्याच्या साधनावरतीच या खासगी द्धसंघानी डल्ला मारला आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाच्या आदेशाचे पालन न करता, ते आदेश मनमानी पद्धतीने पायदळी तुडविला आहे. अशा प्रकारे गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालण्याचे पाप या खासगी दुध संघानी केले आहे. त्यांचेवर कायदेशीर चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत.

तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घातक रसायनांची खुलेआम भेसळ केली जाते. यामध्ये खासगी दूध संघ व अन्न व औषध प्रशासनाच्या संगनमताने ही भेसळ चालू आहे व ग्राहकाच्या जीवीताशी खेळण्याचे महापाप या पांढऱ्या दुधातील काळ्या बोक्यांनी केले आहे. म्हणूनच शेतकऱ्याच्या निर्भेळ दुग्ध उत्पादनाला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळत नाही. म्हणूनच आम्ही दुध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने आमच्या मागण्या खालीलप्रमाणे –

१) दुध दरवाढ झालीच पाहिजे. गाईच्या दुधाला ३.५ फॅट व ८.५ SNF ला रु. ४० व म्हैशीच्या दुधाला ६.०फॅट व ९.० SNF ला रु. ६० दर मिळालाच पाहिजे.

२ ) दुधाची वजनमापे गुणनियंत्रक विभागाने प्रत्येक डेअरीवर दरमहा तपासणी पथके सुरु करावीत.

३) ११ मार्च २०२४ पासून बंद झालेले अनुदान विनाअटी शर्ती सुरु करावे.

४) उत्तरप्रदेश राज्याच्या धर्तीवर भाकड जनावरांना प्रतीमाह रु. १५०० अनुदान द्यावे. ५) पशुखाद्याच्या गुणवत्तेवर व दरावर शासनाने नियंत्रण ठेवावे व दुधाळ जनावरांचा मोफत विमा शासनाने काढावा.

६) दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रभावी अमंलबजावणी करावी.

७) दुध संघातून बाहेर महामार्गावर येणाऱ्या दुधाचे टँकर व दुधजन्य पदार्थ याचे नमुने तपासूनच विक्रीसाठी पाठवावे. (८) अन्न व औषध प्रशासनाने दुध भेसळ रोखण्यासाठी किती कार्यवाही केल्या त्याचा अहवाल प्रसिध्द करावा.
वरील मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य न झाल्यास दि. १ जुलै २०२४ पासून दुध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. पुढील होणाऱ्या कार्यवाहीस प्रशासन जबाबदार राहील.
यावेळी प्रल्हाद पाटील, संजय माने, श्रीकांत मोहिते, सम्मेद पाटील यांच्या सह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.