प्रतिष्ठा न्यूज

स्वच्छतोत्सव उपक्रमांतर्गत सांगली महानगरपालिकेच्या वतीने रॅली

प्रतिष्ठा न्यूज/ स्नेहलता वर्धमाने
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या स्वच्छतोत्सव २०२३ उपक्रमांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी २९ मार्च रोजी मनपा क्षेत्रात प्रभाग निहाय स्वच्छता मशाल मार्च रॅली काढण्यात आली. सदर स्वच्छता मशाल मार्च रॅली महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार प्रभाग समिती १ ची रॅली सकाळी ८ ते १० या वेळेत आरोग्य विभाग मुख्यालय – तानाजी चौक – पटेल चौक – राजवाडा चौक – स्टेशन चौक या मार्गावरून,प्रभाग समिती २ ची रॅली सकाळी ७:३० ते १० या वेळेत गणेश नगर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर – सिव्हिल चौक – पुष्पराज चौक सांगली या मार्गावरून,प्रभाग समिती ३ ची रॅली मनपा विभागीय कार्यालय ते मुख्य भारत सुत गिरणी चौक या मार्गावरून, प्रभाग समिती ४ ची रॅली सकाळी ७:३० ते १० या वेळेत लक्ष्मी मार्केट – जुने फायर स्टेशन मार्गे बाराईमम दर्गा – बॉम्बे बेकरी त- गणेश तलाव मार्गे शिवाजी चौक मिरज या मार्गावरून स्वच्छ मशाल फेरी पार पाडली. या रॅलीमध्ये शून्य कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि कचरा मुक्त शहरांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वच्छता शपथ घेण्यात आल्या. या रॅलीचे नियोजन आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे यांनी केले. या रॅलीमध्ये महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, महिला कॅप्टन संपदा अमोल पाटील मनपा ब्रँड ॲम्बेसेडर, पर्यावरण अभियंता वैष्णवी कुंभार, सामाजिक संस्था, नागरिक, पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी तसेच स्वच्छता कर्मचारी असे १८४० जणांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.