प्रतिष्ठा न्यूज

तासगाव चोरी प्रकरनातील सर्व आरोपी तासगाव तालुक्यातील : एलसीबीचें सागर टिंगरे यांची धडाकेबाज कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव येथे काल रात्री नाशिक येथील द्राक्ष व्यापाऱ्याची गाडी अडवून झालेल्या 1 कोटी 10 लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणी तीन आरोपींना पकडन्यात पोलिसांना यश आले आहे.आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह पकडण्यात आले आहे.तासगाव सांगली रोडवरील गणेश कॉलनी येथे अंधाराचा फायदा घेऊन स्कॉर्पिओ गाडी अडवून नाशिक चें व्यापारी व इतर दोघांना मारहाण करून 1 कोटी 10 लाख रुपये घेऊन आरोपीनी पोबारा केला होता.या प्रकरणी महेश केवलानी पिंपंळगाव सध्या राहणार तासगाव यांनी फिर्याद दिली होती.त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेशण पथकाला यश आले आहे.नितीन खंडू यलमार,विकास मारुती पाटील,अजित राजेंद्र पाटील तिघेही राहणार मतकूनकी अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटना स्थळी भेट देऊन विविध पथके ठिकठिकाणी पाठवली होती.*याचवेळी एलसीबीचें सागर टिंगरे* यांना गोपनीय बातमीदारान मार्फत चोरट्यांची माहिती मिळाली.कांड करणारा नितीन यलमार हा आपल्या साथीदारा सोबत शिकोबा डोंगराच्या पायथ्याशी थांबल्याची माहिती टिंगरे यांना मिळाली.त्यांनी तातडीने हि माहिती आपल्या वरिष्ठाना दिली.या माहितीच्या आधारे एलसीबीचें सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने शीकोबा डोंगराच्या पायथ्याला छापा मारला.त्यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात या तीन संशयीतांच्या मुस्क्या आवळल्या.यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गाडी आणि एक तलवार आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,तासगावच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,सागर टिंगरे प्रशांत निशानदार,संदीप गुरव,सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे,अनिल कोळेकर,संदीप पाटील, संतोष गळवे, विक्रम खोत, चेतन महाजन,प्रशांत माळी, सुनील लोखंडे,अमोल ऐदाळे,प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे,अजय बेंद्रे, गौतम कांबळे,सचीन कनप,दीपक गठ्ठे, गजानन घस्ते, सुधीर गोरे,यांनी केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.