प्रतिष्ठा न्यूज

जनावरांना अमानुष वागणुक देवून अवैध कत्तल करण्याचे हेतुने बेकायदेशीररित्या डांबुन ठेवणारे ४ आरोपी जेरबंद, २०३ जनावरे ताब्यात : कवठेमहांकाळ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची संयुक्त कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जनावरांना अमानुष वागणुक देवून अवैध कत्तल करण्याचे हेतुने बेकायदेशीररित्या डांबुन ठेवणारे ४ आरोपी जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४,५०,०००/- रू. किंमतीची २०३ लहानमोठी गोवंशीय व म्हैस वर्गीय जनावरे ताब्यात घेण्यात आले. कवठेमहांकाळ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी ही कारवाई केली.
संशयित आरोपी नांव पत्ता
१) बाजीराव ज्ञानू चंदनशिवे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ,
२) आण्णाप्पा ऊर्फ सुखदेव चंदनशिवे रा. मेघराजा मंदिराजवळ, कवठेमहांकाळ,
३) संजय वाघमारे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ.
४) हिमंत चंदनशिवे, रा. आंबडेकर नगर, कवठेमहांकाळ

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
मा. पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यात कत्तलीला बंदी असलेल्या गोवंश व म्हैस जातीची जनावरे कवठेमहांकाळ शहरात व परिसरात असलेल्या ०४ वेगवेगळया शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवण्यात आलेली असून सदरची जनावरे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात घेवून जाणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली.
त्या अनुशंगाने दि. ०३/०६/२०२४ रोजी दोन पंचासह कवठेमहांकाळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकामार्फत शिवाजीनगर, एमआयडीसी कवठेमहांकाळ, थबडेवाडी, – आंबेडकरनगर- कवठेमहांकाळ अशा ०४ वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी १) बाजीराव ज्ञानू चंदनशिवे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ, २) आण्णाप्पा ऊर्फ सुखदेव चंदनशिवे रा. मेघराजा मंदिराजवळ, कवठेमहांकाळ. ३) संजय वाघमारे रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ. ४) हिमंत चंदनशिवे, रा. आंबडेकर नगर, कवठेमहांकाळ यांचे मालकीचे पत्र्याचे शेडमध्ये नमुद आरोपींनी आर्थिक फायदयाकरीता एकूण २०३ गोवंशीय व म्हैस वर्गीय जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेचे दिसुन आले. लागलीच सदर चारही ठिकाणांचा सविस्तर पंचनामा पंचासमक्ष करण्यात आला असून सदर ठिकाणी मिळून आलेली एकूण २०३ गोवंशीय व म्हैस वर्गीय जनावरांना ताब्यात घेऊन सदर जनावरांना भगवान महावीर गोशाळा, कराड येथे संगोपनासाठी जमा केले आहे.
सदरबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात चारही आरोपींना अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींना १ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था.गु.अ.शाखा,
सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उप निरीक्षक वैभव पाटील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, पोहेकॉ/४१३ पाटील, पोहेकॉ /१००६ खोत, पोना/२०४३ साबळे, पोशि/१४१९ करांडे, पोशि११३४ वसमळे, पोशि /व्हनमराठे, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, पोहेकॉ / अससिध्द खोत, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, पोना/संदीप नलावडे, स्था.गु.अ.शाखा,

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.