प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत उद्या मराठा उद्योजक संस्थेचा वर्धापन व शिव राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचा ६ व्या वर्धापन दिन आणि ३५० वा शिवराज्याभिषेक दिन यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन गुरूवार दि. ६ जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजता मराठा सेवा संघ सांस्कृतीक भवन, राष्ट्रमाता जिजाऊ मार्ग, सिव्हील हॉस्पिटल मागे, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. मराठा सेवा संघ व संलग्न ३२ कक्ष या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
बीड येथील शिव व्याख्याते शिवश्री भागचंद झांजे यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरू या विषयावर व्याख्यान होणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट स्मिता पाटील, तासगाव, डेरी उद्योजक प्रशांत पाटील, सांगली, संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार यांच्या सह सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील उद्योजक आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.