प्रतिष्ठा न्यूज

तासगावात गुटखा पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई बाबत पोलिसांची चालढकल ; मनसेचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव शहरात सह तालुक्यात अवैधरित्या सर्व दुकानाना  गुटखा पुरवत असणाऱ्या वर तातडीने कारवाई करून तरुणाई व्यसनाधीन होण्यापासून वाचवा,असे निवेदन मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हाध्यक्ष अमोल काळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांना दिले आहे.यावर तासगाव पोलीस चालढकल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की तासगाव शहरासह तालुक्यामध्ये अवैधरित्या दुकान मालकांना गुटखा पुरविणान्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून तासगाव पोलीस निरीक्षक यांना दि. २४ फेब्रुवारी रोजी निवेदनाव्दारे कळविण्यात आले होते. मात्र निवेदनानंतर १५ दिवसानंतरही हा व्यवसाय राजरोसपणे सुरूच असलेचे दिसून आले.त्यानंतर दि.११ मार्च रोजी स्मरणपत्र लिहून तासगाव पोलीस निरिक्षक यांना कारवाई बाबत विनंती केली,परंतु आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही.
महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना तासगाव शहरात आणि तालुक्यामध्ये मात्र परराज्यात उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखु आदी पदार्थ पुरवठा करणारी टोळी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकिय असल्याचे दिसत आहे.ही टोळी परराज्यातून मोठया प्रमाणावर गुटख्याची खरेदी करून तासगाव शहरामध्ये साठा करून तालुक्यातील अनेक दुकानदारांना वाढीव दराने राजरोसपणे विक्री करत असल्याचे दिसत आहे.शासनाकडून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या विरूध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश असूनही यामध्ये कोणतीही कारवाई झाल्याची दिसून येत नाही.त्याचाच फायदा घेत संबंधीत तस्करी करणारी टोळी मोटार सायकलचा वापर करून राजरोज पणे ग्रामीण भागात वितरीत करत आहेत.त्यामुळे तालुक्यातील युवापिढी व्यसनाधिन होत आहे.तरी आपण या विषयात स्वतः हा लक्ष देऊन संबंधित तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमोल काळे यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.