प्रतिष्ठा न्यूज

मिरजेत प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती करा; मिरज कार्यालय राम भरोसे मिरज सुधार समितीचा कार्यालयास ठाळे ठोकण्याचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण, नगररचना, बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार राम भरोसे झाला आहे. अधिकारी नसल्याने कर्मचारी सुध्दा दांडी मारत असल्याने किरकोळ कामांसाठी सुध्दा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. म्हणून मिरज कार्यालयात सर्वच विभागात प्रभारी अधिकारी नियुक्त करून त्यांना वार व वेळ ठरवून देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. पंधरा दिवसांत याबाबत लेखी आदेश न झाल्यास मिरज विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही मिरज सुधार समितीने दिला आहे.

मंगळवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, सलीम खतीब, वसीम सय्यद, अभिजीत दाणेकर, रवी बनसोडे आदी कार्यकर्त्यांनी अतिरिक्त्त आयुक्त रविकांत आडसुळ यांची भेट घेतली. मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण, नगररचना, बांधकाम व आरोग्य विभागात प्रभारी अधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. सर्वच विभागातील प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांना वार व वेळ ठरवून देण्याची मागणी केली. मागण्यांबाबत १५ जूलै पर्यंत निर्णय न झाल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयास टाळे ठोकतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनाची प्रत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.