प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे नगरपालिका प्रशासन स्वच्छता ठेकेदाराला पाठीशी घालत आहे काय? – मनसे नेते अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव नगरपरिषदेने नेमून दिलेल्या स्वच्छता ठेकेदाराने तासगाव शहरातील स्वच्छतेचें तीनतेरा वाजवले आहेत,तासगांव शहरातील काही प्रमुख ठिकाणाच्या रस्त्यांची स्वच्छता केली जाते उर्वरीत शहरातील बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे.नगरपरिषदेने घालून दिलेल्या नियमाच पालन करणे गरजेचे असतानाही कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही.
याबाबत ठेकेदाराला समज देऊन शहर स्वच्छ करण्याबद्दल मनसे नेते अमोल काळे यांनी तासगाव नगरपरिषदेला दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते.
नगरपरिषद हद्दीतील सर्व रस्ते,गल्या, बोळ,सर्व खुल्या जागा,नगरपरिषदेच्या सर्व इमारती,कार्यालय,व्यापारी संकुल शॉपिंग सेंटर इ.ठिकाणची साफसफाई करणे बंधनकारक असून देखील या गोष्टी होताना दिसून येत नाहीत. सायंकाळी बाजारपेठेतील (मच्छी मार्केट व मटन मार्केट सह.)त्या त्या
प्रभागातील कचरा उठाव करणे बंधनकारक असतानाही सायंकाळच्या वेळी तो तसाच पडलेला दिसून येतो.
शहरातील सर्व शौचालये,न.प.सर्व सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या,सर्व शॉपिंग सेंटर मधील शौचालय व मुताऱ्या यांची स्वच्छता दररोज करणे गरजेचे असतानाही स्वच्छता कर्मचारी ती स्वच्छता आठवडयातुन एकदा करताना दिसून येतात.त्यामुळे या भागामध्ये दुर्गंधी पसरत आहे.व अस्वच्छता मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत आहे.छोटया मोठ्या गटारींची साफसफाई आठवडयातुन १ वेळ करणे गरजेचे असून देखील या कडे ठेकेदार लक्षही देत नसल्याचे दिसून येते.त्यामुळे सभोवतालच्या परिसरात डासांचे प्रमाण वाढलेले आहे.या सर्व प्रकारामुळे तासगांव शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.नगरपरिषदेकडून कोठयावधी रूपये या ठेकेदारास दिले जातात.तरीही तासगांव करांना अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे.तरी या विषयात स्वतः प्रशासनाने लक्ष देवून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता,परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही यासाठी मनसे नेते अमोल काळे यांनी नगर परिषद प्रशासनास काल पुन्हा निवेदन देऊन ठेकेदारावर काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आहे.येत्या दोन तीन दिवसात याबाबत संपूर्ण माहिती मिळावि अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.