प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या 25 व्या वर्धापन दिनी माजी महापौर उपमहापौरांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 25 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेत आजवरच्या सर्व माजी महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते माजी महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये महापालिकेची स्थापना झालेल्या पहिल्या महापौर उपमहापौर यांच्यापासून ते यापूर्वीच्या महापौर उपमहापौर यांच्या पर्यंत सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेत्या भारती दिगडे , विरोधीपक्षनेते संजय मेंढे, उपआयुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.