प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज यांचावतीने श्रमसंस्कार शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज यांचावतीने श्रमसंस्कार शिबीर संपन्न
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज, मिरज यांचावतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत माधवनगर येथे निवासी श्रमसंस्कार शिबीर गेले ७ दिवस उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. अंजू शेखर तोरो, उपसरपंच श्री. सचिन श्रीपती पाटील, सौ. संगीता विजय पवार व सौ. पूनम गजानन होनवार यांचा हस्ते करण्यात आले. शिबिराची सुरुवात पर्यावरण जनजागृती रॅलीने करण्यात आली. ७ दिवसाच्या या शिबिरात सर्वरोग निदान, होमिओपॅथिक उपचार, ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन,’एड्स जनजागृती’ यावर पथनाट्य, रक्तगट तपासणी, वृक्षारोपण व शालेय मुलांची वैद्यकीय तपासणी, गरोदर महिलांचा वैद्यकीय तपासणी, आरोग्य शिक्षण, स्वच्छता सर्वेक्षण आदि उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये लायन्स नेत्र रुग्णालय सांगली, यांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली.
शिबिराची सांगता समारंभ गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांचा उपस्तीथित पार पडला. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी भावी डॉक्टरांना समाजसेवेचे महत्व सांगितले व स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. सुहास पाटील, डॉ. जीनेश्वर यलिगौडा, डॉ. प्रताप भोसले, डॉ. बिडीवाले, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. अनिता नातू, डॉ. वैशाली सावंत, डॉ. सेजल माळी, डॉ. वैशाली माने, डॉ. विवेक घाडगे, डॉ. समीर तांबोळी, डॉ. भाग्यश्री शिंगे उपस्थित होते.
शिबिराचे संयोजन जिल्हा समन्वयक व प्रकल्प अधिकारी डॉ. जीनेश्वर यलिगौडा व विद्यापीठ प्रतिनिधी जबीहुर्रहमान शेख, एन.एस.एस विद्यार्थी प्रतिनिधी नाजिया देसाई व प्रज्वल पाटील यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.