प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने रविवारी उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड : शहरातील मल्टीपर्पज,हायस्कूल मैदान,हनुमान पेठ, महावीर चौक येथेरविवार दिनांक 5/3/2023 रोजी  सायंकाळी ठीक 6:00 वा. वाजता शिवगर्जना अभियाना अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते प्रसिद्ध इतिहास तज्ञ साहित्यिक श्री नितीन बानगुडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परभणी चे शिवसेना खासदार संजय बंडू जाधव तसेच शिवसेनेच्या उपनेत्या श्रीमती ज्योतीताई   ठाकरे ,शिवसेनेचे  नेते संपर्क प्रमुख श्री बबनराव थोरात, आदी मान्यवर नेत्यांचे मार्गदर्शन यावेळी होणारआहे. तरी या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख श्री दत्ता पाटील कोकाटे उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, माजी खासदार श्री सुभाष वानखेडे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर माजी आमदार अनुसयाताई  खेडकर शिवसेनेचे जिल्हासमन्वयक प्रमुख जि.प.सदस्य श्री दशरथराव लोहबंदे तसेच मराठवाडा सह संपर्क प्रमुख  धोंडू दादा पाटील , जिल्हा प्रमुख माधव   भाऊ पावडे ,माजी आमदार श्री रोहिदास पाटील चव्हाण भाई मुक्तेश्वर भाऊ धोंडगे श्री दत्ता पाटील पाथरडकर महेश पाटील देगलूरकर यांनी आवाहन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.