प्रतिष्ठा न्यूज

मिरज येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अंतर्गत महिला आरोग्य, समस्या आणि उपाय या विषयावर जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज येथील वेताळबा नगर येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अंतर्गत समाजकार्य विषयाची पदवीत्तर पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने *महिलांचे आरोग्य, समस्या आणि उपाय* या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम मा डॉ नर्गिस सय्यद (नगरसेविका, सां. मि. कु. शहर महानगरपालिका, मिरज)आणि मा डॉ रिनाज पटेल (स्त्री रोग तज्ञ्, सिनर्जी हॉस्पिटल, मिरज) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी बोलताना मा डॉ नर्गिस सय्यद म्हणाल्या की महिलामध्ये रक्ताचे प्रमाण कायम कमी असते कारण रोजच्या आहारामध्ये फळे, भाजीपाला, सकस कडधान्ये यांचा समावेश जास्त प्रमाणात नसतो.म्हणून सकस आहार घेणे, किमान वर्षातून तीन वेळा डॉक्टर कडे जाऊन शरीराची पुर्ण तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण महिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्या तरच कुटुंब, समाज आणि राष्ट्र भक्कम होईल. यासाठी महिलांच्या आरोग्यावर जागरूकपणे काम करणे अत्यंत गरजेचे आहे असे म्हणाल्या.

यानंतर मा डॉ रिनाज पटेल मॅडम यांनी महिलांच्या विविध शारीरिक प्रश्नावर खुला सवांद केला. यात मासिक पाळी, अंगावरून जाणे, योग्य व सकस आहाराबरोबरच योग्य व्यायाम करणे याचे महत्व सांगितले. अंगात रक्त वाढविणेसाठी उपाय सांगितले आणि महिलांच्या विविध प्रश्नाचे शंका निरसन केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दल चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा परशुराम कुंडले सर हे होते. यांनी महिलांनी स्वतःचे जीवन आनंदी बनविण्यासाठी आज प्रमुख अतिथी यांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असणार आहे. असे जनजागृतीचे कार्यक्रम दर तीन महिन्यातून एकदा घेण्याची अत्यंत गरज असल्याचे दिसून आल्याने त्या पद्धतीने नियोजन करूया असे सांगितले जेणेकरून महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य याबाबत सक्षमपणे काम करता येईल असे म्हणाले.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन श्री युवराज मगदूम यांनी केले.व संविधानावर आधारित समतेची गाणी घेवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर अतिथी यांचे संयोजकाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन  स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेचे विद्यार्थी व कार्यक्रम संयोजक मा प्रसाद कुंडले यांनी केले. पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज मगदूम यांनी केले.शेवटी कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम सहसंयोजक व संचालिका सावित्री महिला बचत गट बँक, मिरजच्या विद्यमान संचालिका मा सौ. कमल माळी मॅडम यांनी मानले .सदर कार्यक्रमांस 40 हुन अधिक महिला उपस्थित होत्या.

आज रमजान निमित्त सायंकाळी रोजा सोडायचा असल्याने हिंदू मुस्लिम महिलांनी एकमेकींसोबत फळे खाऊन एकत्रितपणे रमजान महिन्याचा दिवस साजरा केल्याने राष्ट्रीय एकात्मता भक्कम असल्याचे दिसून आले व उपस्थित महिलांनी सुद्धा आनंद व्यक्त केला.
यावेळी सौ कमल माळी मॅडम, सौ पुष्पा कुंडले व इतर पदाधिकारी आणि एरियातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमानंतर सर्वाना नाश्ता देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.