प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेच्या जामवाडी आरोग्य वर्धीनी केंद्राकडून आरोग्य शिबीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या जामवाडी आरोग्य वर्धीनी केंद्राकडून प्रभाग 12 मधील बागवान हॉल, मगरमच्छ कॉलनी, साथरोग प्रतिबंध अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर, रक्त तपासणी करण्यात आली. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा पाटील, मलेरिया कर्मचारी तसेच आरोग्य केंद्राकडील सर्व स्टाफ आशा उपस्थित होत्या.
यावेळी वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी उपस्थित नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुणिया, गॅस्ट्रो अशा पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांची माहिती दिली व प्रतिबामधात्मक उपायांबाबत जनजागृती केली. जनजागृती करिता वैद्यकीय आरोग्यधिकारी यांच्या उपस्थित सर्व जामवाडी आरोग्यकेंद्राचा स्टाफ, मलेरिया कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेज स्टाफ यांनी मगरमच्छ कॉलनीमध्ये रॅली काढली. तसेच स्थानिक नागरिकांना महितीपत्रकांचे वाटप केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.