प्रतिष्ठा न्यूज

गायन स्पर्धेत साई बकुरे नाशिक जिल्ह्यात द्वितीय

प्रतिष्ठा न्यूज /जावेद पिंजारी
वणी दि.14 : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा नुकतीच, नाशिक येथे पार पडली.
यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्याही कला, क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा ही आयोजित करण्यात आल्या होत्या. यात वैयक्तिक गायन स्पर्धेत जि प प्रा शा परमोरी चा विद्यार्थी साई दादाजी बकुरे याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते साई चा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

साई बकुरे यास उपक्रमशील व तंत्र स्नेही शिक्षक नौशाद अब्बास यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख उपस्थित होते.

साई बकुरे चे परमोरी चे सरपंच नवनाथ काळोगे, उपसरपंच दिलीप केदार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच परमोरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गांगोडे, शिक्षण तज्ज्ञ केशव शिवले, सर्व शालेय शिक्षण समिती सदस्य, गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण नागरिक यांनी अभिनंदन केले आहे. गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, केंद्रप्रमुख संजय जगताप, परमोरी शाळेचे सर्व शिक्षकांनी साई बकुरे आणि मार्गदर्शक शिक्षक नौशाद यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.