प्रतिष्ठा न्यूज

शेतकऱ्यांचा पिक विमा त्वरीत मंजूर करून देण्यात यावा- संभाजी ब्रिगेडची मागणी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षीचा प्रधानमंत्री पिक विमा त्वरित मंजूर करून देण्यात यावा या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा.जिल्हाधिकारी नांदेड, यांना देण्यात आले आहे.
शेतकरी वर्षभर तनमनधन सर्वस्व पणाला लाऊन अहोरात्र शेतात राबत असतो पण निसर्गाच्या अवकृपेने हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टी, ऊन वारा, पाऊस न पडणे या कारणाने आपण केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून शासनाने सांगितल्या प्रमाणे पिक विमा कंपन्या कडुन विमा काडून घेत असतो मात्र या कंपन्या विमा मंजूर करूनही शेतकऱ्यांना देत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल होतो. लाखो शेतकरी पिकविमा भरन्यासाठी लाखो रुपये भरतात पण आत्तापर्यंत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम विमा रक्कम, पुर्ण विमा मिळायला पाहिजे होता तो युनायटेड इंडिया इन्सुरन्स कंपनीने अद्याप दिला नाही आठ दिवसांत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा न केल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष कोल्हे, भगवान कदम, परमेश्वर पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- डॉ. विद्या पाटील, प्रदीप गुबरे, मोहन शिंदे, कमलेश कदम, हरिभाऊ भोसले, अशोक कदम, अंकुश कोल्हे, ज्ञानोबा कदम, बालाजी मुळे, स्वप्नील शिंदे, सारंग मिराशे, संतोष आसर्जनकर, प्रेमानंद पिंपरीकर यांच्या सह संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.