प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील मदनभाऊ पाटील खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये ₹ १,००,१००/- रकमेच्या पारितोषिकांची लयलूट

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने, कै.मदनभाऊ पाटील युवा मंच व केपीएस चेस ॲकॅडमी , सांगली आयोजित वर्ष ५ वे कै. मदनभाऊ पाटील खुली बुध्दिबळ स्पर्धा  दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी कच्छी भवन, राममंदिर कार्नर , सांगली येथे सकाळी ०९:०० वाजता संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये ₹ १,००,१००/- रकमेची पारितोषिके असून स्पर्धेच्या पारितोषिकांची एकूण संख्या २५० पेक्षा जास्त  आहे. प्रथम पारितोषिक ₹१५०००/- , द्वितीय ₹१२५००/- तृतीय ₹ १००००/-, ४ थे ७५००/-, ५ वे ₹ ५०००/-, ६वे  २५००/- तर क्रं ७ वे ते १० पर्यंत ₹ १०००/- ११ ते १५   ₹ ९००/-, १६ ते २५ ₹७५०/-, २६ ते ५०
₹ ५००/- तसेच सांगली सोडून महाराष्ट्रातील खेळाडूंना १ ते १० पारितोषिके व रू. ४००/-,  उत्कृष्ठ राज्य खेळाडू महाराष्ट्र सोडून ₹५५०/-  व चषक, ९,११,१३,१५ , वयोगटासाठी प्रत्येकी १० पारितोषिके, १ ते ५ क्रमांकासाठी ३५०/- व चषक , १ ते ५ क्रमांकाना चषक , खास पारितोषिके महिला, ज्येष्ठ ,अपंग  प्रत्येकी ३ पारितोषिके, ₹४५०/- व चषक , ७ वर्षाखालील ५ उत्कृष्ठ इर्मजींग खेळाडू,  चषक व पारितोषिके , उत्कृष्ठ सांगली जिल्हा खेळाडू १० पारितोषिक रू. ३५०/- व चषक ,त्याचबरोबर सांगली जिल्हयांतील ७,९,११,१३,१५ वर्षाखालील खेळाडूंना प्रत्येकी ५ चषक , पहिल्या १० उत्कृष्ठ शाळा व अँकँडमी यांनी प्रत्येकी १ चषक, या खेळाडूंची स्पर्धा फी रू. ४५०/- असून  ती  विजयकुमार् माने यांच्या गुगल पे नं.८३९००१८३०८ वर भरणेची आहे. तर गुगल फार्म भरणे आवश्यक आहे. या खेळाडूंना दुपारचे जेवण व चहा मोफत दिला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संतोष पाटील, नगरसेवक, सांगली महानगरपालिका तर स्पर्धेचे आयोजन केपीएस चेस अँकँडमीचे  विजयकुमार माने यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.