प्रतिष्ठा न्यूज

शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी नवी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’:-दैविक कॅपसुलमुळे 20 ते 40 टक्के पाण्याचीही होते बचत – आशिष पालीवाल

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : ऊस उत्पादनात हेक्टरी 14 ते 17 टन उत्पादन वाढ तसेच पाण्याचीही 20 ते 40 टक्के बचत करणारी “नॅनो टेक्नॉलॉजी” मध्यप्रदेशचे शास्त्रज्ञ आशीष पालीवाल यांनी विकसित केली असून या टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी नुकतीच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाल्याची माहिती शास्त्रज्ञ आशिष पालीवाल यांनी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, SRD केमिकल मध्यप्रदेश या कंपनीने नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारीत गेल्या 15 वर्षापासून संशोधन करुन दैविक कॅपसुल निर्माण केली आहे. सदरच्या उत्पादनाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी येथे 2021-22 या वर्षात सुरु ऊसावर चाचणी (प्रयोग) घेण्यात आली. या प्रयोगाचे निष्कर्ष अत्यंत आशादायक आहेत. दैविक कॅपसुल वापरल्यामुळे एकूण ऊस उत्पादनात वाढ झालेली आहे. दैविक कॅपसुलची सुरुवातीस आळवणी व 60, 90 व 120 दिवसांनी फवारणी केली असता 14.17 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन वाढले आहे. तसेच आळवणी न करता सुध्दा 14.15 टन प्रति हेक्टर उत्पादन वाढले आहे. या प्रयोगामधून अतिशय महत्वाचे निष्कर्ष पाणी वापरा बद्दलचेही आहेत. दैविक कॅपसुलची आळवणी व फवारणी केली असता 80 व टक्के ETC 60 टक्के ETC या पध्दतीने पाणी वापरले असता प्रचलित पध्दतीपेक्षा अनुक्रमे 14.17 व 14.15 टन प्रतिहेक्टर उत्पादन वाढले आहे. हे निष्कर्ष ऊस उत्पादकांना अत्यंत मोलाचे आहेत. कारण प्रचलित पाणी वापरा पेक्षा कमी पाणी वापरून उत्पादन वाढ झालेली आहे. दैविक कॅपसुलच्या वापरामुळे कमी पाणी वापरुनही ऊसाच्या 1 गुणवत्तेमध्ये महत्वपूर्ण बदल आढळले आहेत. साखर कारखान्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा CCS (कमर्शियल केन शुगर) चे प्रमाण वाढले आहे. लक्षावधी टन गाळप गृहित धरल्यास अत्यंत मोठा फायदा कारखान्यांना होणार आहे आणि रिकव्हरीप्रमाणे FRP धोरणास अनुसरून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. दैविक कॅपसुलच्या वापरामुळे पाण्यात बचत, उत्पादनात वाढ व ऊसाची गुणवत्ता वाढल्यामुळे शेतकरी तसेच एकूणच साखर उद्योगास फायदा होणार आहे. हा फायदा फक्त साखर उद्योगास नसुन साखर उद्योगाचे भारतीय शेतीतील महत्व लक्षात घेता एका अर्थाने देशाचाही फायदा होईल असे म्हणता येईल. दैविक कॅपसुलच्या वापरामुळे 20 ते 49 टक्के पाण्याची बचत झाली आहे. त्यामुळे कसाला भरमसाठ पाणी लागते हा समज 1 कमी होईल व हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशादायक आहे. आशिष पालीवाल वरिष्ठ शास्त्रज्ञ SRDकेमिकल यांनी प्रति एकरी 12 ग्रॅम (40 कॅपसुल) वापरण्याचा सल्ला दिला आहे. दैविक कम्सुलच्या संशोधना दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग घेण्यात आले. दैविक कालच्या वापरामुळे फायदा झालेले 20 हजार पेक्षा जास्त शेतकरी कंपनीच्या सतत संपर्कात असतात.पालीवाल पुढे म्हणाले की, देशामध्ये ज्या क्षेत्रांमध्ये शेतीच्या पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी ऊसासारखे नगदी पीक घेता येवू शकेल.दैविक कॅपसुलच्या वापरामुळे तृणधान्य,कडधान्य,कापूस तसेच फळबागां मध्येही कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त करून अधिक माहिती साठी Faceboot page SRD CHEMI वर जा. असे पालीवाल यांनी सांगितले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.