प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले 21 मोबाईल काढले शोधून…मोबाईल धारकांकडून पोलिसांचे अभिनंदन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मोबाईल गहाळ झाला म्हंटल की शक्यतो सापडतच नाही,गेला की गेला असं समजून त्या मोबाईलचा आणि त्यातील सिमचा गैर वापर होऊ नये म्हणून नागरिक पोलीस स्टेशनला किरकोळ तक्रार करून विषय सोडून देतात.परंतु पोलीस दप्तरी नोंद असलेल्या आणि वारंवार येणाऱ्या मोबाईल चोरीच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बसवराज तेली सांगली,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग तासगांव सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तासगांव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा.अमोल चव्हाण,पोलीस कॉ.सुरज जगदाळे, पोलीस कॉ.योगेश जाधव व पोलीस कॉ.विवेक साळुंखे सायबर सेल सांगली यांनी तब्बल 2 लाख 50 हजारच्या 21 मोबाईलचा शोध घेतला आहे.तासगांव शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने बेदाणा मार्केट,द्राक्ष मार्केटच्या प्रमुख्य बाजार पेठ आहेत.त्यामुळे आजुबाजुच्या गावातुन दररोज हजारोच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षणासाठी तासगांव मध्ये येत असतात.त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे.पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पथकाने अश्या गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन माहीती प्राप्त करुन सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन,*महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातुन* 21 मोबाईलचा शोध घेवुन तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांचे मोबाईल शोधून मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत केले आहेत.गरीबीची परस्थिती असताना देखील कर्ज काढुन घेतलेले मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन तासागांव पोलीसां विषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.मोबाईल धारकांच्या कडुन पोलीसांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
सदर ची कामगीरी पोलीस अधीक्षक  बसवराज तेली सांगली,अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव विभाग तासगांव सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ तासगांव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा.अमोल चव्हाण,पोलीस कॉ.सुरज जगदाळे, पोलीस कॉ.योगेश जाधव व पोलीस कॉ.विवेक साळुंखे सायबर सेल सांगली यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.