प्रतिष्ठा न्यूज

अखेर एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार; दादा भुसे, शंभूराजे देसाई, चंद्रकांत दादा पाटील,सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित यांची वर्णी

प्रतिष्ठा न्यूज/ विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिन्याभराहून अधिक काळ प्रलंबित असलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. राजभवनावर मंत्रीमंडळ विस्ताराचा हा शपथविधी झाला. पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
अखेर शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना शपथ देण्यात आली. भाजपकडून गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना शपथ देण्यात आली आहे.
एक महिन्यापासून एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सुरू होती. आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. विशेष म्हणजे या मंत्रीमंडळ विस्तारात मात्र संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा सुद्धा समावेश करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.