प्रतिष्ठा न्यूज

संविधान दिनानिमित्त सांगलीत बाईक रॅलीस प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 26 : संविधान ‍दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सामाजिक न्याय पुरस्कार प्राप्त अशोक पवार, नितीन जोंधळे, अरुण परसुळे, विठ्ठल काळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाचा जागर करणारा समता चित्ररथ व बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस. टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, महानगरपालिका इमारत मार्ग – सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक – राम मंदिर मार्गे पुष्कराज चौकात रॅलीची सांगता झाली. संविधानाचा जागर करून या माध्मयातून घराघरात समता पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.