प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजय काकांच्या प्रयत्नांने विस्तारित टेंभू योजनेला अखेर सु.प्र.मा मिळाली… शेतकऱ्यांनी मानले खासदारांचे आभार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एकूण 21 गावांचा विस्तारित टेंभू योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.यामुळे या गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळणार आहे.यासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच वर्षांचा प्रलंबित प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटला आहे.खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सु.प्र.मा.) मिळाली आहे.तासगाव तालुक्यातील सावळज वायफळे डोंगरसोनी वडगाव लोकरेवाडी बिरणवाडी यमगरवाडी दहिवडी कचरेवाडी किंदरवाडी नरसेवाडी धोंडेवाडी विजयनगर तसेच कवठेमंकाळ तालुक्यातील कुंडलापूर गर्जेवाडी रायवाडी केरेवाडी शेळकेवाडी जाकापूर जायगव्हाण लोणारवाडी या आठ गावांचा विस्तारित टेंभू योजनेमध्ये समावेश झाल्याने बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला आहे.यासाठी प्रभाकरबाबा पाटील यांनी काकांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.प्रभाकरबाबा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेला आणखी गती मिळाली.आज सुप्रमाला मान्यता मिळताच खासदार संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व समावेश झालेल्या गावातील लोकांनी फटाके फोडून आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला.यावेळी अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून खासदार संजय काकांनी दिलेला शब्द पाळला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना खासदारच न्याय देऊ शकतात अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्यातून उमटत आहेत.यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी पाण्याविना कोणी वंचित राहू नये शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे यासाठी मी प्रयत्नशील आहे,केवळ आपल्या जिल्ह्यासाठी नव्हे तर दुष्काळी पट्ट्यासाठी विस्तारित टेंभू योजना महत्त्वाची होती अखेर या योजनेला आज सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आजचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला असून राज्य सरकारने सुप्रमाला मान्यता दिल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.