प्रतिष्ठा न्यूज

शिक्षण सेवक सहकारी सोसायटीत विमान येणार..गणरायांच्या साक्षीनं राजर्षि शाहू पुरोगामी पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फुटला..!!

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सहा हजाराहून अधिक सभासद   व सव्वा पाच हजार मतदार असलेल्या सांगलीच्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. ११ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पुरोगामी विचाराच्या १९ उमेदवारांचे राजर्षि शाहू पुरोगामी पॅनेल विमान चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आज सांगलीत श्री गणेश मंदिरात या पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रचार प्रमुख महावीर सौंदत्ते यांनी पुरोगामी विचारांचे राजर्षि शाहू पुरोगामी पॅनेल शंभर टक्के भरघोस मतांनी निवडून येणार असून या पॅनेलचे उमेदवार हे सक्षम व विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. सर्वच उमेदवार स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी कटीबध्द आहेत. राजर्षी शाहू महाराज आणि संस्थापक स्व. अनंत परांजपे यांच्या विचारांचा आदर्श पॅनेलसमोर आहे. संस्था व सभासद हितासाठी हे पॅनेल उत्तम कारभार करणार आहे असे प्रतिपादन केले.
या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी स्फूर्ती स्थळावर स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे पुष्पहार घालून अभिवादन केले. छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, स्व. गुलाबराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील व महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शक समितीचे अध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे, उपाध्यक्ष आनंदराव पाटील व संभाजी पाटील, सचिव आर. एस. सातपुते, सहसचिव अरिफ गोलंदाज, सदस्य आर. टी. पाटील, दिलीप पाटील, एम. एस. पाटील,रतन कुंभार, आशिष यमगर, पॅनेलचे सर्व १९ उमेदवार, शिराळ्याचे संजय पाटील, बाळासाहेब गायकवाड, सुहास दळवी, वसंतराव चौगुले, सांगलीचे राजमती गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक दादासाहेब पाटील, सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चोपडे व पर्यवेक्षक आबासाहेब कोळी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांचे महेश जायाप्पा, महावीर पाटील, महावीर ढोले, स्वप्नील पाटील, सातगोंडा पाटील, विजय चव्हाण, सचिन नवले, सचिन रुईकर, संजय बिरनाळे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राणी सरस्वती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता माने व स्टाफ, यशवंनगर हायस्कुलचे मुख्याध्यापक कुंभार सर व स्टाफ, सांगली शिक्षण संस्थेचे नवनाथ लाड व सहकारी,जत तालुक्यातील उटगीचे मुख्याध्यापक एम. एस. पाटील, सुनील पाटील व सहकारी, बस्तवडेचे सुभाष सावंत, विलास गायकवाड, शंकर माळी, कृष्णदेव पाटील, धनश्री माळी, अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे एल. टी. शेंडगे, एस. ए. पाटील व शिक्षक, सर्वोदयचे अशोक वाघमोडे, प्रोटाॅन संस्थेचे परशुराम रणधीर, माळवाडीचे राजीव कदम, सांगली शिक्षण संस्थेचे बुधगावचे संगिता पाटील , सिटी हायस्कूलचे जोग सर , पटवर्धन हायस्कूलचे लाड सर, म. के. आठवले व्हनखंडे, माधवनगरचे साठे सर, मुमताज खतीब, डॉ. अरुण मिरजकर, कवठेमहांकाळचे संजय वांगेकर, शिवाजीराव देसाई, विशाल ठोंबरे, सचिन पाटील, महारु बहिरम, डी. एम. कोळेकर, दिपक हंकारे, पलूसचे चंद्रकांत चव्हाण, संगिता पाटील, राजाराम व्हनखंडे, गजानन दरुरे, प्रविण खोत, युवराज साठे आणि सांगली जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राजर्षी शाहू पुरोगामी पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून येणार हे आजच्या प्रचार शुभारंभातून स्पष्ट झाले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.