प्रतिष्ठा न्यूज

एम. टी. ई .एस इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची “ स्कुल संसदेच्या ” उन्हाळी अधिवेशनासाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे   
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम .टी .ई .एस. इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची  फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या उन्हाळी अधिवेशनासाठी निवड झाली आहे. या स्कुल संसदेचे आयोजन दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी केले होते. यामध्ये, महाराष्ट्रातून २५० प्रशाला सहभागी झाल्या होत्या. त्यामधून ५० शाळांची निवड करण्यात आली. या स्कूल संसदेमध्ये आपल्या प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ते पुढील प्रमाणे…..
१) कु. अर्णव राहुल कवडे
२) कु. अमेय अभिजीत पोरे
३) कु. स्वयंम राहुल सवदत्ती
         ८ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या, पहिल्या फेरीमध्ये मुलांनी दिलेल्या पाच मिनिटांच्या अवधीमध्ये निवडलेल्या “ भूजल पातळी आणि पुनर्भरण ” या विषयावरती उत्कृष्ट इंग्रजी संभाषण व नेतृत्वगुणांचा यथोचित वापर करून हा विषय प्रभावीपणे सादर केला. प्रभावी सादरीकरणामुळे त्यांची निवड अंतिम फेरीमध्ये होणार्‍या उन्हाळी अधिवेशनासाठी झाली आहे. या यशामुळे प्रशालेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
          त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज (बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव  सुरेंद्र चौगुले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी यांनी केले. पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.