प्रतिष्ठा न्यूज

विट्याच्या निर्भया पथकाचा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : विटा निर्भया पथकातील असलेले पोहेकॉ एस वाय साळुंखे,पोना मोहिते,पोकॉ माळी,मपोकॉ भाट हें लेंगरे,वेजेगाव,खरसुंडी यामार्गे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराने आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील पंचकृषी विदयालय,झरे आटपाडी समोर रोडवर एका काळया रंगाच्या गाडीवरुन दोन इसमांनी एका महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारुन तें मायणीचे दिशेने जोरात निघुन गेले आहेत व गाडीवरील एका इसमाने लाल कलरचा शर्ट व एकाने पिवळया कलरचा गर्ट घातला असल्याचे सांगितले.त्याप्रमाणे निर्भया पथकाने खरसुंडी येथुन झरे गावातुन कलेढोण तरसवाडी,विभुतवाडी असे पेट्रोलिंग करत रोडने जाणारे संशयितरित्या आढळून आले. पेट्रोलिंग करताना दुचाकी स्वारांकडे चौकशी चालू असताना गोपनीय खबऱ्याने वर्णन केल्या प्रमाणे काळ्या रंगाचे पल्सर मोटर सायकलवरील एक लाल शर्ट व पिवळा टि-शर्ट घातलेले इसम पथका कडे बघून जोरात निघुन गेले.त्यावेळी  त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवून पथकाला बघुन जोरात निघुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी काही समाधानकारक माहिती दिली नाही तसेच ते घाबरलेले स्थितीत दिसुन आले.त्यामुळे लाल शर्ट घातलेल्या इसमाचे नाव विचारता त्याने त्याचे नाव भास्कर सुखदेव सावंत रा. कोतीज ता. कडेगाव जि.सांगली असे सांगितले व पिवळा टि-शर्ट घातलेल्या इसमाचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सुधाकर अशोक मोहिते रा. कोतीज ता.कडेगाव जि.सांगली असे सांगितले.त्यानंतर सदर इसमांची अंगझडती घेतली असता सुधाकर अशोक मोहिते याचे पॅन्टचे खिशात एक सोन्याचे मंगळसुत्र मिळून आले. त्यावेळी त्याला सदर मंगळसुत्राबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यानंतर सदर इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचे मंगळसुत्र हे झरे ता.आटपाडी येथुन एक महिलेचे गळ्यातून हिसडा मारुन चोरुन आणले असलेबाबाबत सांगितले.त्यावरुन सदर घटनेबाबत आटपाडी पोलीस ठाणेस माहिती घेतली असता आटपाडी पोलीस ठाणेत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.dysp कदम मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली विटा निर्भया पथकाने प्रसंगावधान दाखवून सदरचा गुन्हा एक तासामध्ये उघड केला या विशेष कामगिरी बद्दल आज मा.सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पथकातील सर्वांचा सत्कार करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.